Tata Punch : 'टाटा पंच'; फक्त 21,000 रूपये भरा अन् बुक करा, तुमची ड्रीम कार
टाटा मोटर्स कंपनीने टाटा पंच ही नवी एसयूव्ही कार रिव्हील केली आहे. (Photo Credit : tatamotors)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता असणारी ही एसयूव्ही गाडीची बुकींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छूक ग्राहक या मायक्रो एसयूव्हीला 21,000 रूपये देऊन बुक करू शकतात. (Photo Credit : tatamotors)
कंपनीने या एसयूव्हीमध्ये स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर ही गाडी थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होते. या गाडीमध्ये तुम्हाल उत्तम मायलेज मिळेल. (Photo Credit : tatamotors)
टाटाच्या या एसयूव्ही गाडीला चार वेगवेगळे परसोना ट्रिम आहेत. यामध्ये प्योर, अॅडव्हेंचर, अकम्पलिश्ड आणि क्रिएटिव्ह या परसोनाचा समावेश होतो. (Photo Credit : tatamotors)
टाटा पंच या गाडीची निर्मीती पुण्यामध्ये स्थित असलेल्या प्लांटमध्ये झाली आहे. (Photo Credit : tatamotors)
कंपनीने टाटा पंच या गाडीला फक्त एका इंजिनचा पर्याय दिला आहे. ज्यामध्ये 1.2 लिटर क्षमतेचे 3 लिटर युक्त नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा वापर केला आहे. (Photo Credit : tatamotors)
गाडीचे इंजिन 5 स्पिड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्ससोबत येते. (Photo Credit : tatamotors)
टाटा पंचची लांबी 3,827mm रुंदी 1,742mm आहे. (Photo Credit : tatamotors)
टाटाच्या या गाडीमध्ये 90 डिग्री उघडणारा दरवाजा देखील आहे. (Photo Credit : tatamotors)
हरमन ऑडिओ सिस्टिम, 4 स्पिकर, इलेक्ट्रीक अॅडजेस्टेबल मिरर, रेअर पावर व्हिंडो, फॉलो मी हॅंडलॅम्प, USB चार्जिंग सॉकेट,फुल व्हील कवर इत्यादी फिचर्स आहेत. (Photo Credit : tatamotors)