कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स; Samsung Galaxy F04 स्मार्टफोन भारतात लॉन्च

Samsung Galaxy F04 Launched in India

1/10
Samsung Galaxy F04 Launched in India: मागील महिन्यात Samsung Galaxy M04 लॉन्च केल्यानंतर Samsung ने भारतीय बाजारात आणखी एक एंट्री-लेव्हल स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
2/10
हा स्मार्टफोन आहे Samsung Galaxy F04. सॅमसंगचा नवीन F-सिरीज स्मार्टफोन Galaxy M04 सारखाच आहे. Samsung Galaxy F04 मध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM आहे.
3/10
F-सिरीज स्मार्टफोनमध्ये 13MP कॅमेरा आणि मोठा HD+ डिस्प्ले आहे. हँडसेटच्या इतर फीचर्समध्ये 5000mAh बॅटरी युनिट, 5MP सेल्फी कॅमेरा, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि 2 Android OS अपग्रेड यांचा समावेश आहे.
4/10
Samsung Galaxy F04 Redmi 10A, Realme C33 आणि Infinix Hot 20 Play शी स्पर्धा करेल.
5/10
4GB + 64GB कॉन्फिगरेशनसाठी Samsung Galaxy F04 ची भारतात किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली (बँक ऑफरसह) आहे. हँडसेटची विक्री 12 जानेवारीपासून केवळ फ्लिपकार्टद्वारे सुरू होईल.
6/10
नवीन Galaxy F04 HD+ (1600 × 720 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 269ppi पिक्सेल Density सह 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले मिळतो. याचा 60Hz रिफ्रेश रेट आहे. जो वॉटरड्रॉप नॉचसह येतो.
7/10
नवीन F-सिरीज स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन 4 GB RAM सह येतो आणि तुम्हाला RAM Plus फीचर्स (Samsung च्या Virtual RAM द्वारे) पहायला मिळते.
8/10
स्मार्टफोन Android 12 वर आधारित OneUI 4.1 बूट करतो. ब्रँड Galaxy F04 साठी दोन Android व्हर्जन अपग्रेडची योजना देखील करत आहे. या नवीन हँडसेटमध्ये मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देखील आहे.
9/10
सॅमसंगचा नवीन F-सिरीज स्मार्टफोन 5000mAh बॅटरी युनिटने सुसज्ज आहे. हा टाइप-सी चार्जिंग पोर्टवर 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोन ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे.
10/10
ज्यामध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि LED फ्लॅशचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी सॅमसंगने हँडसेटमध्ये 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
Sponsored Links by Taboola