Electric Cars | देशात 'या' इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ, काय आहेत फीचर्स आणि किंमत?
भारतात आज कमी किमतीत आणि चांगल्या फीचर्ससह इलेक्ट्रिक कार उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इलेक्ट्रिक कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. या कारमध्ये आकर्षक डिझाइन आणि दमदार इंजिन आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTata Tiago EV - टाटा टियागो कारचे इलेक्ट्रिक मॉडेलची सध्या बाजारात खूपच मागणी आहे. या कारची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. फीचर्सविषयी सांगायचं तर यात थ्री फेज एसी इंडक्शन मोटर बसवण्यात आलं आहे. एकदा ही कार फुल चार्ज केली की आपण 140 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतो. याची बॅटरी क्षमता 21.5kWh आहे.
Tata Nexon EV टाटाची नेक्सॉन कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही बर्यापैकी लोकप्रिय होत आहे. या कारची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे. एकदा ही कार चार्ज केली की 300 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. कारची बॅटरी क्षमता 30.2kWh आहे. या कारमध्ये एसी तंत्रज्ञान आहे, त्यामुळे लांब प्रवासानंतरही कारच्या इंजिनचे तापमान कायम राहतं.
Hyundai Kona Electric - ह्युंदाईची ही इलेक्ट्रिक कार लोकांच्या पसंतील उतरत आहे. उत्तम डिझाइन असलेल्या या कारची किंमत सुमारे 24 लाख रुपये आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर आधारित या कारमध्ये परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 450 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. याची बॅटरी क्षमता 39.2kWh आहे.
MG ZS EV ही कंपनी जगभरात प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनांसाठी परिचित आहे. या कारची किंमत सुमारे 21 लाख रुपये आहे. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही कार 340 किमी पर्यंत प्रवास करू शकते. ही कार वेगवान चार्जिंगच्या फीचरसह सुसज्ज आहे.