MG Astor Turbo Petrol Automatic : शानदार लुक आणि लेटेस्ट फीचर्सचं कॉम्बिनेशन, पैसा होणार वसूल!
खूप कमी वेळेत MG मोटर ने Astor च्या रूपात चौथी एसयूवी बाजारात आणलीये..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAstor चा लूक एकदम जबरदस्त आहे, बाकी गाड्यांपेक्षा थोडी मोठी असलेली ही गाडी स्पोर्टी लूक देते..
या गाडीच्या इंटीरियर ची क्वालिटी सुद्धा एकदम उत्तम असून ड्यूल-टोन आणि पूर्ण ब्लैक इंटीरियर अश्या तीन कलर स्कीम्स उपलब्ध असणारेत..
स्पेस च्या बाबतीत Astor भरपूर आरामदायक आहे, मागच्या बाजूचा हेडरूम/लेगरूम बराच चांगला दिला गेलाय..
एमजी ने नेहमीसारखचं Astorला टेक्नोलॉजी आणि फीचर्सच्या बाबतीत वरचढ बनवलय.. यात 10.1 इंच ची सेंट्रल टचस्क्रीन क्रिस्प टच फंक्शनलिटी दिली आहे..
अजून सांगायचं झालं तर गाडीमध्ये एक मोठा पैनोरमिक सनरूफ दिला गेलाय जो गाडीचा 90 टक्के छप्पर कवर करतो..
इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360 डिग्री कैमरा, एयर प्योरिफायर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम और स्मार्टफोन कनेक्टिविटी इत्यादी गोष्टी गाडीला उंचीवर पोहचवतात..
पण या गाडीत वायरलेस चार्जिंग, ऑटो डिमिंग रियर व्यू मिरर नाहीयेत..
ही गाडी स्पेस आणि फीचर्सचं परफैक्ट कॉम्बिनेशन आहे, खूप मोठी नाही पण खूप छोटीही नसलेली ही गाडी एक उत्तम पर्याय म्हणून समोर येतीये.