Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : मुंबईच्या आकाशात भव्य ड्रोन शो; 'अंडरवर्ल्ड गँग वॉर्स' गेमची झाली घोषणा
भारतातील बच्चे कंपनी पब्जी अर्था बीजीएमआय गेम मोठ्या प्रमाणात खेळत असते. आता याचसारखा आणखी एक गेम आता लवकरच उपलब्ध होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेहेम स्टुडिओजने त्यांच्या पहिल्या वहिल्या बॅटल रॉयल गेमची घोषणा केली असून अंडरवर्ल्ड गँग वॉर्स असं या गेमचं नाव असणार आहे.
मंगळवारी या गेमची घोषणा कंपनीतर्फे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे करण्यात आली.
विशेष म्हणजे हा गेम जितका खास आहे, तितकीच त्याची घोषणाही खासप्रकारे कंपनीतर्फे करण्यात आली.
तब्बल 500 ड्रोन्स(Drone Show) मुंबईच्या आकाशात उडवत या गेमचं नाव सर्वांसमोर जाहीर करण्यात आलं. मेहेम स्टुडिओजने मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे ड्रोन शोच्या माध्यमातून या गेमच्या नावाचं अनावरण केलं.
यावेळी 500 ड्रोन्स महालक्ष्मी रेसकोर्समध्ये एकत्र उडाले, त्यानंतर आधी बंदूक मग बंदूक पकडलेल्या माणसाची आकृती असे विविध आकार ड्रोन्सनी घेतले,
अखेर गेमचं नाव झळकल्यानंतर एक क्यूआर कोडही यावेळी तयार झाला. ज्याला उपस्थितांनी स्कॅन केलं असता थेट गेमचा युट्यूबवरील टीझर सर्वांना पाहायला मिळाला
'अंडरवर्ल्ड गँग वॉर्स' हा गेम भारतातील दोन टोळींच्या शत्रुत्वाच्या अवतीभोवती फिरणार आहे.
या गेमला विशिष्ट कथानक देखील असेणार असल्याचे कंपनीने सांगितले.
लवकरच हा गेम सर्वांसाठी मोबाईलमध्ये उपलब्ध होणार असून 22 मे रोजी याचे प्रिरजीस्ट्रेशन होणार आहे.