In Photo | सिक्युरिटी फीचरसह स्वस्त टॉप-5 कार

Continues below advertisement

Feature_Photo_

Continues below advertisement
1/6
गाडी खरेदी करताना सुरक्षेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. जर एखाद्यावेळी गाडीचा अपघात झाला तर गाडीतील सिक्यरिटी फीचर महत्त्वाचे ठरतात. मात्र सिक्युरिटी फीचरमुळे गाडीची किंमतीह तितकीच वाढते. तर सिक्युरिटी फीचरसह येणाऱ्या स्वस्त कारवर एक नजर टाकुया.
2/6
ह्युंडाई एलिट आय 20 : ह्युंडाई देशातील पहिला कंपनी आहे, जिने कॉम्पॅक्ट सेडान कार आय 20मध्ये एअरबॅग्ज दिल्या आहेत. ह्युंडाई एलिट आय 20 च्या टॉप व्हेरियंटमध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्ज मिळतील. त्यामध्ये पेट्रोल व डिझेलचे असे दोन इंजिन पर्याय मिळतील. दोन्हींमध्ये 6 एअरबॅग मिळत आहेत. ह्युंडाई आय 20 ची किंमत 5.88 लाख पासून सुरू होते.
3/6
ह्युंडाई वेरना : ह्युंडाईच्या प्रसिद्ध सेडान कारमध्ये ह्युंडाई वेरनाचा समावेश आहे. ही कार त्याच्या विभागातील सर्वाधिक विक्री करणार्‍या कारमधील एक आहे. लूकसह सेफ्टी फीचरसाठीही कार ओळखली जाते. या कारच्या टॉप मॉडेलमध्ये 6 एअरबॅगचा पर्याय आहे. या कारची किंमत 8.72 लाखापासून सुरु होते.
4/6
फोर्ड इको स्पोर्ट : सब 4-मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर इको स्पोर्ट बेस्ट ऑप्शन आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कार मजबूत आहे. ही कार भारतात खूप लोकप्रिय आहे. आपल्याला इको स्पोर्टमध्ये 6 एअरबॅग्ज मिळतील. इतर सर्व महत्त्वाची सिक्युरिटी फीचर्सही या कारमध्ये देण्यात आले आहेत. इको स्पोर्ट ही त्याच्या विभागातील एकमेव कार आहे जी 6 एअरबॅगसह येते. आपल्याला ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन या दोन्ही पर्यायांमध्ये मिळेल. त्याची किंमत 8.63 लाख रुपये पासून सुरू होते.
5/6
फोर्ड फिगो : हॅचबॅक कारमध्ये समाविष्ट असलेली फोर्ड फिगो ही सुरक्षिततेच्या दृष्टीने एक मजबूत कार आहे. ही कार भारतातील स्वस्त कारमध्ये मोजली जाते, जी 6 एअरबॅगसह येते. मात्र या कारच्या टॉप मॉडेलमध्ये एअरबॅग मिळतात. फोर्ड फिगो पेट्रोल आणि डिझेल इंजिन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 6.01 लाखापासून सुरु होते.
Continues below advertisement
6/6
फोर्ड फिगो एस्पायर : फोर्ड फिगो एस्पायर कंपनी ही सब 4 मीटरची कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. या कारमध्ये उत्तम सिक्युरिटी फीचर मिळतात. फोर्ड फिगो एस्पायरमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. मात्र सहा एअरबॅक केवळ टॉप मॉडेलमध्ये मिळतील. या कारची किंमती 6.16 लाख रुपयांपासून सुरु होते.
Sponsored Links by Taboola