IN PICS | Aston Martin ची पहिली SUV कार DBX भारतात लाँच
कारचा लूक, क्वालिटी, परफॉर्मन्स आणि रस्त्यावरील अनुभन हे निकष जमेची बाजू ठरत असले तरीही, डीबीएक्सचा दर ही बाब मात्र कारप्रेमींना खटकणारी बाब ठरत आहे हे नाकारता येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही कार म्हणजेच DBX. ही अॅस्टनची पहिली एसयूव्ही कार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण, या कारचा स्वतंत्र असा निर्मिती कारखानाही आहे.
कारच्या क्षमतेविषयी सांगावं तर, यामध्ये 4.0 लीटर ट्विन टर्बोचार्ज्ड व्ही 8 पेट्रोल मोटार देण्यात आली आहे. 9 स्पीड टॉर्क कनव्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सनं ही कार सुसज्ज आहे. अतिशय गतीमध्ये असताना ही कार अवघ्या 4.5 सेकंदांत 100 किमी प्रतितासाचा वेग पकडते.
कारचे फ्रेमलेस दरवाजे उघडताच आतील आलिशान इंटेरिअर लक्ष वेधलं. उत्तम डिझाईनचा नमुना इथं पाहायला मिळतो. लाकूड, धातू, काच आणि लेदर यांचा वापर कारच्या इंटेरिअरमध्ये करण्यात आला आहे.
भारतीय बाजारात या कारची किंमत 3.82 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीच या कारची विक्री सुरु झाली आहे. कारप्रेमींसाठी यामध्ये बहुविध फिचर्स देण्यात आले आहेत. शिवाय ही कार आपल्या आवडीनुसार कस्टमाईजहबी करता येणार आहे. पण, अर्थातच त्यासाठी वाढीव पैसेही मोजावे लागणार आहेत.
प्राधान्यानं स्पोर्ट्स कारच्या निर्मितीसाठी आणि जेम्स बॉण्डच्या पसंतीची कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅस्टन मार्टिन या कंपनीनं भारतात एक नवी कार सर्वांच्याच भेटीला आणली आहे. Aston Martin कडून नुकतंच भारतात त्यांच्या DBX या मॉडेलचं अनावरण करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -