Mercedes AMG A 45 S : भारतातील सर्वात महागडी मर्सिडिज-बेंझ इंडियाची Hatchback लक्झरी कार लाँच
मर्सिडिज-बेंझ इंडियाने भारतातील सर्वात महागडी हॅचबॅक लक्झरी कार लाँच केली आहे. जाणून घ्या कारबाबत.. (Photo:@MercedesBenzInd/Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर्मनीची लक्झरी कार कंपनी मर्सिडज-बेंझने (Mercedes-Benz) शुक्रवारी आपली नवीन कॉम्पॅक्ट कार एएमजी ए-45 एस 4 मॅटिक+ सादर केली. (Photo:@MercedesBenzInd/Twitter)
या कारची एक्स-शोरूम किंमत 79.50 लाख इतकी आहे. मर्सिडिज-बेंझ इंडियाने म्हटले की, ही कारमध्ये 2 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. (Photo:@MercedesBenzInd/Twitter)
या इंजिनमुळे 421 अश्वशक्ती मिळते. ही कार अवघ्या 3.9 सेकंदात 0-100 किमी प्रति तास इतका वेग पकडते. या कारचा अधिकाधिक वेग 270 किमी प्रतितास इतका आहे. (Photo:@MercedesBenzInd/Twitter)
या कारमध्ये एएमजी स्पीडशिफ्ट डीसीटी 8जी ट्रान्समिशन आहे. ज्याला विशेष करून एएमजी ए45 एस इंजिनला जोडण्यात आले आहे. (Photo:@MercedesBenzInd/Twitter)
या कारमध्ये एएमजी अॅक्टिव्ह राइड कंट्रोल आणि एएमजी परफॉर्मन्स 4मॅटिक+ ऑल-व्हील ड्राइव्ह एएमजी टॉर्क कंट्रोल दिले आहेत. कारमध्ये एक विशिष्ट ड्रिफ्ट मोड देखील आहे. कारमध्ये स्लिपरी, कम्फर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट +, इंडिव्हिजुअल आणि रेस ड्राइव्ह मोड आहेत. (Photo:@MercedesBenzInd/Twitter)
मर्सिडिज-बेंझ इंडियाचे संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी म्हटले की आम्ही नवीन मर्सिडिज-एएमजी ए45 एस 4 मॅटिक+ भारतात लाँच केली आहे. आम्ही आपल्या ए-क्लास श्रेणीला मजबूत करत आहोत. ही देशातील सर्वात महागडी हॅचबॅक कार आहे. कंपनी नव्या पिढीतील स्पोर्ट्स कारलाही महत्त्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. (Photo:@MercedesBenzInd/Twitter)