Amazon Fab Phone Sale: अॅमेझॉनच्या सेलमध्ये टॉप ब्रँड्सवर सूट, काय आहेत ऑफर्स?
ऑनलाईन शॉपिंग प्लटफॉर्म अॅमेझॉनवर फॅब फोन फेस्टची सुरुवात झाली आहे. 25 मार्चपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या फेस्टमध्ये स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीज कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये अॅपल, वनप्लस, सॅमसंग आणि शाओमी यासह अनेक ब्रँडवर सूट मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅमेझॉनच्या या सेममध्ये आपण आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच एक्सचेंज ऑफरही दिल्या जात आहेत. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहे.
प्राइम मेंबर्स एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सद्वारे खरेदी करून नो कॉस्ट ईएमआयचा फायदा घेऊ शकतात. यामध्ये किमान ईएमआयचा 1,333 रुपये असणार आहे.
OnePlus: OnePlus Nord या फोनची किंमत 29,999 रुपयापासून सुरु होत आहे. वनप्लस स्मार्टफोनमध्ये सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळत आहे.
iPhone:अॅमेझॉनच्या या सेलमध्ये iPhone 12 Mini कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन सेलमध्ये 61,100 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. अॅपलच्या या 5 जी फोनमध्ये बायोनिक चिप दिली आहे.
Samsung Galaxy M series:अॅमेझॉनच्या या सेलमध्ये Samsung Galaxy M 12, Samsung Galaxy M02 आणि Samsung Galaxy M02s हे फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनवर 25 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच सहा महिने नो-कॉस्ट ईएमआयच्या ऑफरचा देखील फायदा मिळू शकतो. तसेच Samsung Galaxy M51 स्मार्टफोनवर 6,000 रुपयांपर्यंत सूट आहे.
Xiaomi : या सेलमध्ये Xiaomi Redmi Note 10 सीरिज, Redmi 9 Power आणि Redmi Mi 10i या स्मार्टफोन्सवर बँक ऑफर आहेत. याशिवाय नुकत्याच लॉन्च झालेल्या Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 वरही चांगल्या ऑफर्स आहेत.