Suzuki V-Strom 250 : सुझुकीची नवी धमाकेदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स...

Suzuki V-Strom SX 250cc

1/6
Suzuki Motorcycle India ने आज आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर बाईक V-Strom 250 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या नवीन बाईकचा टीझर रिलीज केला होता. या बाईकची किंमत 2.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
2/6
भारतात लॉन्च केलेली ही Suzuki V-Strom 250 परदेशात विकल्या जाणाऱ्या बाईक्सपेक्षा खूपच वेगळी आहे. ही बाईक Gixxer 250 रेंज प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
3/6
डिझाईनच्या बाबतीत बोलायचे तर, बाईकला ऑल-एलईडी हेडलॅम्प, एक हाय व्हिझर, स्प्लिट-सीट सेट-अप इत्यादी गोष्टी देण्यात आल्या आहेत.
4/6
नवीन V-Strom 250 चॅम्पियन यलो, पर्ल ब्लेझ ऑरेंज आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
5/6
V-Strom 250 त्याच 249cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन सपोर्टेड आहे. ही मोटर 9,300 rpm वर 26.1 HP आणि 7,300 rpm वर 22.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते, जी 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.
6/6
याला समोरील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स, मागील बाजूस मोनो-शॉक ऑब्सर्व्हर आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स मिळतात. ब्रेकिंग ड्युटीसाठी, बाईकला ड्युअल चॅनल ABS आणि दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक मिळतात. (All Photo : Twitter)
Sponsored Links by Taboola