Supriya Sule On Santosh Deshmukh Murder Case: सुप्रिया सुळेंनीही वाल्मिक कराडचं नाव घेतलं, मस्साजोगमध्ये जाऊन म्हणाल्या, त्याची हिम्मतच कशी झाली!

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशमुख कुटुंबियांचं सात्वन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी केज पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना फाशी द्या, अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंकडे केली.

कृष्णा आंधळेला 25 तारखेपर्यंत न पकडल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा देखील देशमुख कुटुंबियांनी दिला.
संतोष देशमुख या माझ्या भावासाठी मी पदर पसरते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आहेतच, सुसंस्कृत नेतेही आहेत. फडणवीसांकडून माझी खूप अपेक्षा होती, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या...मी कोणाला भेटणार नाही, तडजोडीचा प्रश्नच नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करु नये. सत्तेची आणि पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देशमुख कुटुंबाच्या सगळ्या कोर्ट केसेस मी पाहणार, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले.
कृष्णा आंधळे कुठे गायब झाला, पोलीस काय करतात. कृष्णा आंधळेचा सीडीआर आम्हाला पाहिजे. अटक झालेल्या आठही आरोपींचा सीडीआर पाहिजे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केली.
देशात खंडणी सगळ्यात मोठा गुन्हा आहे. बीड सुसंस्कृत आहे. या पाच पंचवीस लोकांनी बीडला बदनाम केले आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बीडमध्ये जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या, तो वाल्मिक कराड...त्या वाल्मिक कराडची हिम्मतच कशी होते, की व्हिडीओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय?, येवढी हिम्मतच कशी झाली? लाज वाटली पाहिजे, असं हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला.
काही गोष्टी या नैतिकतेवर आहेत. संजय राठोड यांच्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेतला होता.त्यामुळे आमच एवढंच म्हणण आहे की त्यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यावा, असंही सुप्रिया सुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर म्हणाला.