Jalna News : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! शेतकऱ्याचा 45 एकर वरील ऊस जळून खाक, लाखोंचे नुकसान
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
16 Feb 2025 07:31 PM (IST)

1
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या हनुमंतखेडा या गावात ऊसाला लागलेल्या आगीत 40 ते 45 एकर ऊस जळून खाक झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
ट्रांसफार्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची घटना घडलीय.

3
यामध्ये जवळपास 12 शेतकऱ्यांचे मिळून जवळपास 40 ते 45 एकर क्षेत्रावरील उसाचे पीक हे पूर्णतः जळून नष्ट झालंय.
4
यात शेतकऱ्याचं जवळ जवळ लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय.
5
काढणीला आलेल्या उसाचे पीक ऐनवेळीला हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा मोठा फटका आणि आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
6
तर या घटनेत 10 ते 12 शेतकर्यांच मिळून अंदाजे 70 ते 75 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.