पंढरपुरात भक्तांची मांदियाळी; सलग सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी रांग
सलग तीन दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात पुन्हा एकदा हजारो पर्यटकांनी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर पुन्हा भक्तांच्या मांदियाळीने भरून गेले आहे.
गेल्या आठवड्यातही सलग सुट्ट्या आल्याने अशाच पद्धतीने गर्दी झाली होती.
या आठवड्यातही हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी तुफान गर्दी केली आहे.
हवामान खात्याने पाच दिवस पावसाचा अंदाज दिला होता. अगदी काल रात्रीही पंढरपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस देखील झाला आहे
तरीही पर्यटकांनी हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा धार्मिक पर्यटनाला प्राधान्य दिल्याने यात्रेसारखी गर्दी झाली आहे.
यामुळे शहरातील सर्व हॉटेल्स लॉज, धर्मशाळेत पाय ठेवायला जागा नाही.
पर्यटकांच्या शेकडोच्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे सर्व पार्किंग फुल झाल्याने रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यात येत आहेत.
विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागा घाटावरील सारडा भवनच्या पुढे गेल्याने भाविकांना दर्शनासाठी दर्शन रांगेत थांबावे लागत आहे.
या हजारो पर्यटकांच्या गर्दीमुळे व्यापारी वर्ग मात्र खुश असून चैत्री यात्रा फेल गेली तरी या महिन्यात सलग सुट्ट्यांमुळे व्यावसायिकाने चांगला व्यवसाय करता आला आहे.