Ujani dam : उजनीत 10.68 TMC गाळ, धरणातील गाळ काढण्याचा प्रकल्प रेंगाळला
गाळ निष्कासन समितीचे अध्यक्षपद रिक्त असल्यानं उजनी धरणातील (ujani dam) गाळ काढण्याचे काम रखडले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिरी या संस्थेने केलेल्या तपासणीनुसार धरणात जवळपास 10.68 TMC गाळ असल्याची माहिती आहे. हा गाळ काढल्यावर कमीत कमी 10 TMC पाणीसाठा वाढणार आहे.
पाण्याचा वापर दुष्काळी भागासाठी करता येणं शक्य होणार आहे. उजनी धरणाच्या निर्मितीपासूनच धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठत असल्यानं क्षमतेएवढा पाणीसाठा धरणात साठवला जात नाही.
उजनी धरणावर सोलापूर महापालिकेसह अनेक नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
अनेक औद्योगिक वसाहतींना उजनी धरणातून पाणीपुरवठा होत असल्यानं शेकडो उद्योग सध्या सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यात सुरु आहेत. मात्र, सध्या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.
गाळ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेण्याची गरज असल्यानं याचे टेंडर बनवण्यासाठी 18 जुलै 2022 रोजी एक समिती गठीत करण्यात आली होती
उजनीतून गाळ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या येणार असल्यानं या समितीला निविदेचा मसुदा आणि अटी शर्ती ठरवण्याचे काम देण्यात आले होते.
समितीच्या अध्यक्षपदी असलेले अधिकारी बढतीवर गेल्यानं हे काम सध्या थंडावले आहे. उजनीत असलेली गाळ आणि वाळूचे सर्वेक्षण करण्याचे काम 2019 मध्ये मेरी या नाशिक येथील संस्थेनं केलं होतं.
अहवालानुसार उजनीत 10.68 TMC एवढा मोठ्या प्रमाणात गाळ असल्याचा अहवाल देण्यात आला होता. यानंतर हा गाळ आणि वाळू काढण्यासाठी मानक निविदेवर काम सुरु आहे.
उजनी धरणातील गाळ काढला तर 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीला पाणी मिळणार