पंढरपूरला येणाऱ्या एसटी बस अन् ट्रकची धडक; भीषण अपघातात 16 प्रवासी जखमी, 6 जण गंभीर
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ घडली घटना घडली असून बसच्या एका बाजुचा भाग अगदी चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे.
Bus accident solapur passenger injured
1/7
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ घडली घटना घडली असून या दुर्घटनेत बसच्या एका बाजुचा भाग अगदी चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे.
2/7
बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली, त्यामध्ये बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
3/7
अपघात एवढा भीषण होता की, बसचा एक भाग पूर्णपणे उघडा पडला आहे. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
4/7
अपघातातील सर्व प्रवाशांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत. मात्र, 5 ते 6 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
5/7
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
6/7
अपघाताचे नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही, पण पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
7/7
अपघातातील जखमींच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली असून काही जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी, रुग्णालयात धाव घेतली आहे.
Published at : 03 Sep 2025 03:41 PM (IST)