PHOTO: सोलापुरात अक्षता सोहळ्याचा उत्साह; 'हर हर महादेव, भक्तलिंग हर्र बोला हर्र...'च्या जयघोषाने सिद्धेश्वर मंदिर परिसर दुमदुमला
महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचं मुख्य विधी असलेला अक्षता सोहळा आज पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहजारो सिद्धेश्वर भक्तांनी हा अभूतपूर्व असा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळं केवळ मोजक्या लोकांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नव्हते.
यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने हजारो भाविक मोठ्या उत्साहात या यात्रेत सहभागी झाली. राजकीय नेत्यांची मंदियाळी देखील या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाली.
सोलापूरचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी बाराबंदी घालून या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी देखील पारंपरिक बाराबंदी वेशात या यात्रेत सहभागी झाले.
एका कुंभाराची कन्या सिद्धेश्वर महाराजांची भक्त होती आणि ती त्यांच्यासोबत विवाह करू इच्छित होती. मात्र महाराज हे योगीपुरूष असल्यामुळे त्यांनी कुंभार कन्येला स्पष्ट नकार दिला. मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या योग दंडाबरोबर विवाह करण्यास सांगितले. तिथूनच हा विवाह सोहळा साजरा केला जातो.
आगळ्या वेगळ्या या विवाह सोहळ्यात सिध्दरामेश्वरांचे भक्त पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करतात. बारा बंद असल्यानं या पोषाखाला बारा बंदी म्हणतात.
बाराबंदीचा मानही आठरा पगड जातीला मिळतोय. समजातल्या सर्व जाती धर्मांना या यात्रेत सामवून घेतल जात. कुठलाही भेदभाव, कुठल्याही निमंत्रणाशिवाय लोक या यात्रेला हजेरी लावतात.
मागील दोन वर्षात अनेकांना हा अभूतपूर्व सोहळा अनुभवता आलेला नव्हता.
त्यामुळे यंदाच्या वर्षी भाविकांची मोठी गर्दी या सोहळ्यात दिसून आली.