Gadda Yatra Soapur : गड्डा यात्रेसाठी सोलापूर सज्ज...पाहा फोटो
900 वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास रुढी परंपरेप्रमाणे 11 जानेवारी पासून सुरुवात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमकरसंक्रांतीच्या काळात जर तुम्ही सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत आलात तर गड्ड्याची सफर केलीच पाहिजे
यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात. यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात.
मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही
कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने यंदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
यात्रेतील धार्मिक विधींना उद्यापासून सुरुवात होणार असून मुख्य धार्मिक विधी एक दिवस उशिरा होणार आहेत, अशी माहिती यात्रेची प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.
दरवर्षी प्रथेप्रमाणे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा पार पडत असतो.
दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत असते. त्यामुळे 13 जानेवारीला सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडत असतो. यंदाच्या वर्षी अधिक महिना आल्यानं मकर संक्रांत ही एक दिवस उशिरा अर्थात 15 जानेवारी रोजी साजरी होणार आहे.
जगण्याचा मनमुराद आनंद घेयला गड्डा यात्रेला नक्कीच यायला हवं