Solapur News: तब्बल दोन ते अडीच किलो वजनाचा एक आंबा, अरण गावचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांचा यशस्वी प्रयोग
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात संत सावता माळींचे गाव आहे अरण. अरण गावचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांच्याकडे सात एकरात विविध फळझाडं आहेत. त्यात सात हजार आंबा सुद्धा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आंबा बागेत होमिओपॅथी औषधं आणि सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केलाय. एक एक आंबा तब्बल दोन ते अडीच किलो वजनाचा आहे. या शरद मँगोपासून 20-22 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे.
सोलापूरच्या आंबा महोत्सवातल्या छोट्या स्टॅालमधले बलदंड आंबे पिकवलेत
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावात घाडगे यांची आंब्याची बाग आहे. 2018 साली घाडगे यांनी आपल्या शेतात 7 हजार आंब्याची झाडं लावली.
गेल्या वर्षी घाडगे यांना हृदयविकाराचा त्रास झाला, त्यानंतर साखरेचं प्रमाणही वाढलं.
यावर त्यांनी कर्नाटकातील डॉ. वीरेंद्रकुमार पाटील यांच्याकडे होमिओपॅथी उपचार घेतले.
इथेच त्यांना डॉ. पाटील हे शेतीसाठीही होमिओपॅथी औषधांचा वापर करतात अशी माहिती मिळाली. घाडगे यांनीही हा प्रयोग करायचं ठरवलं.
होमिओपॅथी औषध वापरण्याआधी दत्तात्रय घाडगे हे सेंद्रिय पद्धतीने शेती करतं होते.
होमिओपॅथी औषधामुळे फक्त दहा दिवसात बराच फरक पडल्याचा दावा घाडगे करतायत. या बलदंड आंब्याचं नामकरण शरद मँगो असं त्यांनी केलं आहे.
बारामती कृषी विज्ञान केंद्रातही गेली 5-6 वर्ष विविध पिकांसाठी होमिओपॅथी वापराचं प्रात्यक्षिक घेतलं जात आहे. त्यांच्या सल्ल्याचाही घाडगेंना फायदा झाला.