जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक गावात जनजीवन विस्कळीत झालं असून शेती आणि घरंही पाण्याखाली गेली आहेत.

Continues below advertisement

solapur heavy rain flood helicopter rescue

Continues below advertisement
1/9
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक गावात जनजीवन विस्कळीत झालं असून शेती आणि घरंही पाण्याखाली गेली आहेत.
2/9
धाराशिवमध्ये काल काही भागात हेलिकॉप्टरने ग्रामस्थांना एअरलिफ्ट करत वाचविण्यात आले होते. तर, आज माढा तालुक्यातही हेलिकॉप्टरच्या गिरक्या पाहायला मिळत आहेत.
3/9
जिथं कधी काळी नेत्यांची हेलिकॉप्टर उडायची, ती पाहायला लोकं गर्दी करायची. पण, मुसळधार पावसाने त्याच गावात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी आता हेलिकॉप्टर गिरक्या घालत आहेत.
4/9
माढा तालुक्यातील महापुरात सीना दारफळ येथे रेस्क्यूसाठी हेलिकॉप्टर दाखल झाले होते. दारफळ येथील बरड वस्तीमध्ये शंभर पेक्षा जास्त नागरिक पुरात अडकले असून त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टर आले.
5/9
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एअरलिफ्ट रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रयत्न केल्याने येथील ग्रामस्थांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याचे काम सुरू झाले होते.
Continues below advertisement
6/9
दरम्यान, माढा तालुक्यातील सीना नदीने करमाळा तालुक्यातील संगोबा येथील आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पाण्याचा विळखा घातल्याने अनेक ग्रामस्थ इथं पाण्यात अडकली आहेत.
7/9
करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यानंतर संगोबा मंदिरात 70 ते 80 नागरिक अडकल्याचं पाहायला मिळालं, यावेळी नागरिकांना मदतीसाठी कुठे बोट, तर कुठे हेलिकॉप्टरलाही पाचारण करण्यात आलं आहे.
8/9
नागरिकांबरोबर महसूल कर्मचारी अडकल्याची माहिती असून हेलिकॉप्टर अथवा NDRF टीम च्या सहाय्याने वाचविण्याची मागणी मंदिरात अडकलेल्या नागरिकांकडून केली जात आहे.
9/9
करमाळा तालुक्यातील संगोबा येथे अडकलेल्या 90 ग्रामस्थांना सोडवायला NDRF ची बोट पोहोचली असून ग्रामस्थांचे रेस्क्यू केले जाणार आहे.
Sponsored Links by Taboola