सोलापूरजवळ धावती सिटीबस पेटली, जळून खाक; चालकाची प्रसंगावधानता, प्रवाशांनी लागलीच उतरवले
solapur news: बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले
Continues below advertisement
solapur news
Continues below advertisement
1/7
सोलापूर शहरातून मुस्ती गावाच्या दिशेने निघालेल्या एका सिटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
2/7
ही घटना सोलापूरच्या बोरामणी गावाजवळ घडली असून, काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झाली.
3/7
बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही
4/7
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर रेल्वे स्थानकावरून ही सिटी बस प्रवाशांसह मुस्ती गावाच्या दिशेने निघाली होती. बोरामणी गावाजवळ आली असता बसच्या इंजिनातून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.
5/7
आग लागल्यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
Continues below advertisement
6/7
दरम्यान, बसला आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
7/7
बसला आग लागल्याचं लक्षात येताच बसचालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Published at : 29 Apr 2025 05:19 PM (IST)