सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस, पाहा सोहळ्याचे खास फोटो!
सकाळी कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते. (सौजन्य : चेतन लिगाडे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुजा झाल्यानंतर यात्रेस प्रारंभ होतो. त्यानंतर श्री सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ १ ते ७ काठ्या येऊन उभारल्यानंतर सरकारतर्फे देशमुख हे हिरेहब्बू यांना सरकारी आहेर करतात. हा मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे. (सौजन्य : चेतन लिगाडे)
तेथून हे नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात ६८ लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा करतात. पूजा झाल्यानंतर त्याठिकाणी शेटे यांना हिरेहब्बू हे विडा देतात. (सौजन्य : चेतन लिगाडे)
त्यानंतर देशमुख, मसरे, कळके, बहिरोपाटील, भोगडे, थोबडे, सिध्दय्या स्वामी, मल्लिनाथ जोडभावी, दर्गोपाटील, शिवशेट्टी, गवसणे, इटाणे (पूजेचे मानकरी, झोळीवाले मानकरी) यांना विडा दिला जातो. हा सर्व विड्यांचा मान हिरेहब्बू देतात. (सौजन्य : चेतन लिगाडे)
त्यानंतर ६८ लिंगास यन्नीमज्जन (तैलाभिषेकांस) प्रारंभ होतो. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा गदगीस तैलाभिषेक घालून विधीवत पूजा हिरेहब्बू करतात. पुढे हे नंदीध्वज सोलापुरातील सर्व ६८ लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री हिरेहब्बूंच्या वाड्यात परत येतात. (सौजन्य : चेतन लिगाडे)
हिरेहब्बू यांच्यावतीने मानकऱ्यांना मानाचा विडा देण्यात आला. (सौजन्य : चेतन लिगाडे)
तैलाभिषेकसाठी भाविक तेल अर्पण करताना (सौजन्य : चेतन लिगाडे)
तैलाभिषेकसाठी मानाचे सात ही नंदीध्वज मिरवणूक निघाली (सौजन्य : चेतन लिगाडे)
नंदिध्वज मिरवणुकीत अश्वनृत्य (सौजन्य : चेतन लिगाडे)
समतेची प्रतिक असलेली सिद्धेश्वर यात्रा कुरेशी मस्जिदसमोर आल्यानंतरचे दृश्य (सौजन्य : चेतन लिगाडे)
मानाचे सात ही नंदीध्वज मंदिरात पोहोचल्यावर (सौजन्य : चेतन लिगाडे)
यात्रेचे प्रमुख मानकरी असलेले हिरेहब्बू (सौजन्य : चेतन लिगाडे)