Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पंढरपूरपर्यंत 56 किमी पायी दिंडी, सांगोल्यातील पाचेगाव खुर्दच्या बांधवांचे पांडुरंगाला साकडे

Solapur Sangola Pachegaon Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सांगोल्यातील पाचेगाव खुर्दच्या नागरिकांनी पाचेगाव ते पंढरपूर अशा 56 किमी पायी दिंडीचे आयोजन केलं होतं.

Continues below advertisement

Solapur Sangola Pachegaon Maratha Reservation

Continues below advertisement
1/8
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं असून त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे.
2/8
त्यांच्या या लढ्याला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्दच्या नागरिकांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला.
3/8
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून पाचेगांव खुर्द ते पंढरपूर अशा 56 किमी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं.
4/8
या दिंडीच्या माध्यमातून पंढरपूर इथे मराठा आरक्षणासाठी पांडुरंगाला साकडं घालण्यात आलं. या वेळी गावातील सर्व वयोगटातील पुरूष आणि महिलांचा सहभाग होता.
5/8
विशेष म्हणजे या दिंडीत काही दिव्यांग मराठा बांधवांनी सहभाग घेतला आणि त्यांनी पांडुरंगाला साकडं घातलं.
Continues below advertisement
6/8
हा दिंडी सोहळा दोन दिवसांच्या होता. यावेळी आयोजकांच्या वतीने दिंडीतील सहभागी वारकऱ्यांसाठी नाश्ता, जेवणाची सोय आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आली होती.
7/8
मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन मिळावं यासाठी सांगोल्यातील पाचेगाव खुर्द या ठिकाणी 1 डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.
8/8
या साखळी उपोषणामध्ये गावातील सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग आहे. महिला आणि मुलांनीही या उपोषणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
Sponsored Links by Taboola