Solapur Rain News: मराठवाड्यात जलप्रलय! गेल्या 70 वर्षाच्यात प्रथमच सीना नदीचे रौद्ररूप; पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा
Solapur Rain News: सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री धुव्वाधार पाऊस बरसला असून या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे.
Continues below advertisement
Solapur Rain News
Continues below advertisement
1/7
Solapur Rain News : सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री धुव्वाधार पाऊस बरसला असून या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदी काठच्या गावांना या महापुराचा धोका निर्माण झाला असून लगतच्या शेतशिवारसह नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे.
2/7
गेल्या दोन दिवसापासून सीना नदी पात्रात 2 लाख पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलं आहे. वैराग जवळील इर्ले गावातील मोहोळ माढा तालुक्याला जोडणारा बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे.
3/7
सीना नदीच्या भोगावती आणि चांदणी नदी धोका पातळी सोडून वाहत असल्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
4/7
मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी इत्यादी गावांना सीना नदीमुळे खरीप हंगामातील पिकांना महापुराचा फटका बसला आहे.
5/7
या सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचे रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आले असून महापुराची भयावह स्थिती यातून समोर आली आहे.
Continues below advertisement
6/7
गेल्या 70 वर्षाच्या काळात प्रथमच सीना नदीला इतके पाणी आल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. सीना नदीचे हे रौद्ररूप खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी आपल्या ड्रोन कॅमेरात नागेश राशिनकर यांनी कैद केलंय.
7/7
सोलापुरातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेकडून पूरग्रस्त गावांची पाहणी करण्यात येत आहे. मोहोळ तालुक्यातील शिंगोली, तरटगाव येथे खासदार प्रणिती शिंदेनी पाहणी केलीय. सोलापूरसह राज्यभरात पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत करा, केंद्र शासनाने महाराष्ट्रसाठी या पूर परिस्थितीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलीय.
Published at : 23 Sep 2025 10:51 AM (IST)