उष्म्यापासून दिलासा मिळण्यासाठी विठुरायाची शीतल चंदन उटी पूजा
वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाळु लागली असताना मंदिर समितीने परंपरेनुसार आजपासून विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात करण्यात आली आहे
Pandharpur vitthal mandir sheetal chandan puja
1/12
हवेतील उष्म्यापासून विठुरायाला शीतलता देणाऱ्या चंदन उटी पूजेस प्रारंभ
2/12
वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाळु लागली असताना मंदिर समितीने परंपरेनुसार आजपासून विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात करण्यात आली
3/12
विठुरायावर केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पूजनासाठी देशभरातील भाविकांकडून मोठी मागणी असते . खास उन्हाळ्यात होणाऱ्या या चंदन उटी पूजा देखील भाविकांच्या खूपच लोकप्रिय असून गेले दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे या पूजा करता न आल्याने यावर्षी चंदन उटी पूजेसाठी भाविकांनी भरभरून बुकिंग केले आहे
4/12
मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सपत्नीक पहिली चंदन उटी पूजा काल गुढीपाडव्याला रात्री साडेबारा वाजता झाल्यानंतर आजपासून भाविकांसाठी या पूजेची सुरुवात झाली आहे
5/12
आता तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ असल्याने विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतल अश्या चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येत असतो.
6/12
यासाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येत असते . चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत हा चंदन उटीची पूजा होत असते . विठुरायाच्या पोषाखाच्यावेळी आता रोज हि पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्या ऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे.
7/12
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली.
8/12
भाविकांच्या हस्ते दरवर्षी ही चंदन उटी पूजा होत असते देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी १ किलो उगाळलेले चंदनाची आवश्यकता असते यात केशर मिसळण्यात येते .
9/12
विठुराया आणि रुक्मिणी मातेला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली हि चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकडा आरतीच्यावेळी काढण्यात येते .
10/12
विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी 21 हजार रुपये तर रुक्मिणी मातेच्या चंदन उटीसाठी 9 हजार रुपये एवढी रक्कम मंदिर समितीमध्ये भरल्यास ही पूजा करता येते
11/12
विशेष म्हणजे मंदिर समितीने आवाहन केल्यानंतर केवळ काहीच दिवसात राज्यभरातील भाविकांकडून सर्व चंदन उटी पूजेचे बुकिंग फुल झाले आहे .
12/12
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. भाविकांच्या हस्ते दरवर्षी ही चंदन उटी पूजा होत असते
Published at : 23 Mar 2023 08:27 PM (IST)