पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा हंगाम असतो. त्यामुळे,भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं.
Continues below advertisement
Pandharpur VIP line close 10 days Devotee
Continues below advertisement
1/7
डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा हंगाम असतो. त्यामुळे,भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं.
2/7
महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूर आणि पंढरपुरातही देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
3/7
सध्या डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून पंढरपुरात दररोज तोबा गर्दी होऊ लागली आहे. त्यातच आता नाताळाच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने भाविकांनी पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
4/7
भाविकांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूर मंदिर समितीने 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत देवाचे व्हीआयपी दर्शन, टोकन दर्शन आणि ऑनलाइन दर्शन पूर्णपणे बंद केले आहे.
5/7
21 ते 31 डिसेंबर म्हणजेच पुढील 10 दिवस भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी केवळ दर्शनरांगेतूच जावे लागणार आहे. मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
Continues below advertisement
6/7
जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन देण्यासाठी देवाच्या पाद्यपूजा देखील 10 दिवसांच्या या कालावधीमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला आहे.
7/7
विठ्ठल दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना गर्दीच्या कालावधीतही कमीत कमी वेळेत दर्शन मिळणे शक्य होणार आहे, या निर्णयामुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे.
Published at : 11 Dec 2025 02:31 PM (IST)