Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur : मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत तीन लाख भाविकांची दाटी, विठुरायाचे Exclusive दर्शन माझावर..
आज मोहिनी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेली दोन महिने काचपेटीत बंद असलेला विठुराया आज काचपेटीतून मुक्त झाला असून आज मोहिनी एकादशीला आलेल्या भाविकांना देवाचे दगडी गाभाऱ्यातील मूळ रूपाचे मुखदर्शन घेता आले आहे.
सध्या मंदिराचे दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम सुरु असल्याने 15 मार्चपासून देवाचे काचपेटीतील रूप दुरून पाहता येत होते.
मात्र आता गाभाऱ्यातील बहुतांश काम पूर्ण झाल्याने देवाच्या भोवती मूर्तीच्या संरक्षणासाठी लावलेली अन ब्रेकेबल काचेची पेटी हटविण्यात आल्याने दगडी गाभाऱ्यातील देवाच्या मूळ रूपाचे दर्शन घेऊन भाविक तृप्त झाले.
आज ABP माझाच्या माध्यमातून देवाचे हे दगडी गर्भगृहातील मूळ रूपाचे exclusive दर्शन घेता येत आहे.
आज वैशाख शुद्ध अर्थात मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरड्या पडलेल्या चंद्रभागेत मुबलक पाणी आल्याने भाविकांना आज मोहिनी एकादशीला पवित्र स्नानाचा आनंद घेता आला.
आजही मंदिरात काम सुरु असल्याने सकाळी सहा ते अकरा एवढ्याच वेळेत मुखदर्शन सुरु ठेवल्याने शेकडोच्या संख्येने भाविकांना विठुरायाच्या मूळरूपाचा मुखदर्शनातून आनंद घेता आला.
आज मोहिनी एकादशीला वारकरी भक्तही हजारोंच्या संख्येने जमा झाल्याने शहराला यात्रेचे स्वरूप मिळाले आहे.