Navaratri 2023 : नवरात्रीची चौथी माळ; रुक्मिणी माता सजली सरस्वती मातेच्या रूपात
Navaratri 2023 Pandharpur : आज चौथ्या माळेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेची पूजा सरस्वती रूपात बांधण्यात आली. नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या रुपात पूजा बांधण्यात येत आहे.
Navaratri 2023 : नवरात्रीची चौथी माळ; रुक्मिणी माता सजली सरस्वती मातेच्या रूपात
1/10
आज शारदीय नवरात्रीचा चौथ्या माळेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेची पूजा सरस्वती रूपात बांधण्यात आली.
2/10
कमरेवर हात ठेऊन उभा असणाऱ्या रुक्मिणी मातेला सरस्वती मातेच्या बैठ्या रूपात सजवताना अतिशय कल्पकतेचा वापर करून ही पूजा बांधण्यात आली.
3/10
सरस्वती मातेच्या रूपात सजवताना रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, नवरत्नांचा हार, जडावाचे बाजूबंद जोड, खड्याची वेणी, तन्मणी, दशावतारी हार, मोर जोड, ठुशी, शिंदे सरकार हार घातला आहे.
4/10
त्याशिवाय, सोन्या मोत्याची तानवड जोड, चंद्र, मोत्यांचा कंठा, बाजीराव गरसोळी, मण्या मोत्याच्या पाटल्या जोड, मोत्यांचे मंगळसूत्र, रूळ जोड, तारा मंडळ ही आभूषणेही परिधान करण्यात आली आहेत.
5/10
कर्णफुले जोड, मोठी नथ, सोन्याची ठुशी, बाजूबंद, शिंदेशाही ठुशी, हिरवी पाचूची चिंचपेटी अशा तब्बल 21 पारंपरिक रत्नजडीत दागिने परिधान करण्यात आले आहेत.
6/10
रुक्मिणी मातेला मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी नेसविण्यात आली असून तिला बैठे रूपात दाखवण्यात आले आहे.
7/10
रुक्मिणी मातेच्या मागे मोरपिसे ठेवण्यात आले आहेत .
8/10
आज विठुरायाला देखील सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, हिरेजडित दंडपेट्या, शिरपेच, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, सोन्याचा तुळशी हार परिधान करण्यात आला.
9/10
त्याशिवाय, हिरेजडित चंद्रहार, सूर्यकाळांचा हार, हिऱ्याचे कंगन जोड, मत्स्य जोड, सोन्याचे तोडे अशा 12 प्रकारच्या विविध हिरेजडित अलंकाराने सजवण्यात आले आहे.
10/10
नवरात्री निमित्त हिरेजडित विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
Published at : 18 Oct 2023 08:16 PM (IST)