Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease : लम्पीचा धोका टाळण्यासाठी आता जनावरांनाही पीपीई किट
मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात लम्पी रोगाने पशुपालक हैराण झाले असून, लाखो रुपये किमतीची जनावरे या रोगामुळे दगावली आहेत.तर, लम्पीचा धोका टाळण्यासाठी आता जनावरांनाही पीपीई किट बनवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर, शासनाकडून होत असलेल्या उपाययोजनाही पूर्णपणे काम करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संसर्ग थांबवण्यासाठी शासनाला गुरांचे बाजार, बैलांच्या शर्यतींवर निर्बंध आणण्याची वेळ आली आहे.
अशावेळी सांगोला तालुक्यातील महूद गावाच्या एका कपडे व्यापाऱ्याने जनावरांसाठी आता पीपीई किट (PPE Kit) बनवली आहे.
यामुळे लम्पीचा धोका टाळून संसर्ग देखील रोखता येण्याचा दावा जितेंद्र बाजारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे अतिशय कमी किमतीत यामुळे आपले पशुधन वाचवता येईल यासाठी शासनाने हा प्रयोगाचा वापर करण्याचे आवाहन देखील बाजारे यांनी केले आहे.
जनावरांवर लम्पीचा धोका वाढू लागल्यावर बाजारे यांनी याचा नीट अभ्यास करून जनावरांसाठी पीपीई कीट बनविण्याचा प्रयोग केला.
सुरुवातीला यासाठी कॉटन कापडाचे कीट बनवून पहिले. त्यानंतर त्यांनी 90 जीएसएम जाडीचे नॉन ओवन फॅब्रिक घेऊन त्यापासून पीपीई कीट बनवली.
ही कीट बनविताना त्या किटला काही विशिष्ट ठिकाणी कप्पे करून त्यात डांबर गोळ्या ठेवल्या. एक माणूस सहजासहजी ही कीट जनावरांना घालू शकेल अशा पद्धतीने या किटची निर्मिती करण्यात आली आहे.
त्यामुळे कीट असतांना देखील गुरांची तपासणी, दूध काढणे शक्य आहे. बाजारे यांच्या गोठ्यात गेल्या 20 वर्षांपासून 55 जनावरे आहे. त्यामुळे त्यांनी या कीटची पहिली ट्रायल आपल्या गोठ्यातील जनावरांवर केली.
बाजारे यांनी यानंतर सांगोला तालुक्यातील लम्पीची साथ मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लोटेवाडी, अजनाळे, माळशिरस, शंकरनगर अशा विविध गावात जाऊन या किटचा प्रयोग केला.
यामुळे, लम्पीचा संसर्ग झालेले जनावरे वाचली असून, त्यांचा प्रादुर्भाव इतर जनावरांना न झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पशुधन वाचण्यास मदत झाली.
आपण बनवलेले पीपीई किट साधारण 1300 ते 1400 रुपयाच्या खर्चात तयार होत असून, यामुळे लाखो रुपयांच्या पशुधनाचे संरक्षण होत असल्याने शासनाने हे पीपीई किट वापरून लम्पी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जितेंद्र बाजारे यांनी केले आहे.