PHOTO : विठुराया-रुक्मिणी मातेच्या चरणी सर्वात मोठं दान
गोरगरिबांचा देव असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण झाले आहे.
Continues below advertisement
Vitthal Temple Donation
Continues below advertisement
1/9
गोरगरिबांचा देव असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्याचरणी आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण झाले आहे.
2/9
जालना इथल्या एका महिला भाविकाने विठ्ठल रुक्मिणी चरणी हे दान अर्पण केले आहे.
3/9
यात जवळपास पावणदोन कोटी रुपयांच्या सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
4/9
विशेष म्हणजे या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली असून या गुप्तदानासाठी कोणताही सत्कार स्वीकारण्यासही या दात्याने नम्रपणे नकार दिला आहे.
5/9
आज वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाहनिमित्त ही अनमोल भेट जालन्यातील महिला भाविकाने अर्पण केली आहे.
Continues below advertisement
6/9
या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी यांना सोन्याचे मुकुट, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले आहेत.
7/9
याशिवाय देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा अशा किमती वस्तू देखील अर्पण केल्या आहेत.
8/9
खरंतर पंढरपूरचा विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो.
9/9
अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पूर्ण करतात. काही भाविक पैसे अथवा सोन्या चांदीचे विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतात.
Published at : 26 Jan 2023 07:31 AM (IST)