Solapur Rain: पावसाचा हाहाकार; सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, एका बाजूने वाहतूक सुरु, पाहा फोटो
Solapur Rain: निसर्गाच्या अवकृपेचा सोलापूरकरांना मोठा फटका बसलाय, सोलापुरातील वज्रेश्वर नगर भागात लाखो रुपये किमतीच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे
Solapur Rain
1/10
सोलापुरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय, निसर्गाच्या अवकृपेचा सोलापूरकरांना मोठा फटका बसलाय, सोलापुरातील वज्रेश्वर नगर भागात लाखो रुपये किमतीच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे
2/10
सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे. सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
3/10
केवळ एका बाजूने वाहतूक सुरु तर पाणी असलेल्या बाजूने केवळ जड वाहतूक सुरु आहे,सोलापूर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत.
4/10
अनेक भागात पाणी शिरल्याने अनेक चार चाक्या, दुचाकी वाहने पाण्याखाली पाहायला मिळतायत. रात्रभर पावसाच्या पाण्यातच ही वाहने राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
5/10
कामगार बहुल भाग असला तरी या भागात अनेक छोटे मोठे उद्योग चालतात. टेकस्टाईल, विडी अशा लहान उद्योगाच्या कारखान्यात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे
6/10
तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारउपयोगी साहित्याचे ही अतोनात नुकसान झालेत, सोलापुरातील वज्रेश्वर नगर परिसरात मोठं नुकसान झालं आहे.
7/10
सोलापुरातल्या अक्कलकोट रोडवरील सादूल पेट्रोल पंप आणि देसाई विडी कारखाना पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सादूल पेट्रोल पंपातील सर्व मशीन पाण्याखाली गेलेत.
8/10
तर देसाई कारखान्यात जवळपास 5 फूट पाणी साचल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. कारखान्यातील विडी उद्योगासाठी लागणारे कच्चे साहित्य, पॅकिंग मटेरील असे लाखोंच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.
9/10
आधीच विडी उद्योग लयाला गेलेला असताना सोलापुरातील प्रमुख कारखान्यापैकी एक असलेला देसाई कारखान्याचे मोठे नुकसान अतिवृष्टीने केलं आहे.
10/10
निसर्गाच्या अवकृपेचा सोलापूरकरांना मोठा फटका बसला आहे.
Published at : 11 Sep 2025 01:12 PM (IST)