Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
देशभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. दिव्यांची उजळण आणि विद्युत रोषणाईने घरोघरी प्रकाश पडलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशासकीय कार्यालये, नेतेमंडळींची घरे आणि मंदिरेही विद्युत रोषणाईने न्हाल्याचं पाहायला मिळत आहेत.
आज नरकचतुर्दशी निमित्त परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला ठेवणीतील हिरेजडित अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
दीपावलीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून विठ्ठल भक्तांनी रांगोळ्याच्या पायघड्याही घातल्या आहेत.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट , कौस्तुभ मणी, दंडपेठया, हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मारवाडी पेठांचा मोत्यांचा हार, मोत्याची कंठी, शिरपेच, मोहरांची माळ, तुळशीची माळ, तोडे जोड, मत्स्य जोड, पदकासह लॉकेट असे हिरेजडित दागिने परिधान केले आहे.
श्री रुक्मिणी मातेस सुवर्ण मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
आज नरकचतुर्दशी निमित्ताने श्री.विठ्ठल सभा मंडप येथे श्री.नंदू शिंदे, मुंबई यांनी श्री.विठ्ठलाची आकर्षक रांगोळी साकारली आहे .
विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिर विविध रंगाने उजळून निघाले आहे.