Solapur : गुरुपौर्णिमानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी; स्वामी समर्थ्यांच्या दर्शनासाठी भर पावसात लोकांची गर्दी
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शेकडो भाविक दाखल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुरुपौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या संख्येने अक्कलकोट येथे येत असतात.
पहाटे साडे पाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी मंदार मोहन यांच्या हस्ते काकड आरती पार पडली.
त्यानंतर महाराजांच्या दर्शनसाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. अगदी पहाटे पासूनच लोक रांगा लावून दर्शनसाठी उभे होते.
अक्कलकोटमध्ये रात्री पासूनच पावसाची संततधार सुरूच आहे. मात्र पावसात देखील नागरिकांनी दर्शनसाठी गर्दी केली होती.
सकाळी 11.30 वाजता महाराजांना महानैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे देखील उपस्थित होते.
यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात महानैवैद्य स्वामी मंदिरात नेण्यात आला.
मागील आठवडाभर गुरुपौर्णिमाचा उत्सव अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतोय. त्यामुळे अनेक भक्तगण याच ठिकाणी निवासी आहेत.
आज दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल स्वामी मंदिरात असणार आहे.