Eid e Milad 2023 : सोलापुरात पैगंबर मोहम्मद यांच्या जयंती निमित्त शोभायात्रा!
सोलापुरात पैगंबर मोहम्मद यांच्या जयंती निमित्त जुलूस अर्थात शोभायात्रा काढण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी पैगंबर जयंतीच्या दिवशी सोलापुरात मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात जुलूस काढत असतात.
यंदा अनंत चतुर्थीच्या दिवशी पैगंबर जयंती होती.
त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम समाज बांधवांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जुलूस काढण्याचा निर्णय घेतला.
सोलापुरातील विजापूस वेस येथून या शोभयात्रेला सुरुवात झाली.
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत या शोभयात्रेचे उदघाटन करण्यात आले.
विशेष म्हणजे सर्वधर्मीय नेते मंडळीची हजेरी देखील या वेळी होती..
या शोभायात्रेत चिमुकल्यानी तयार केलेले विविध देखावे घेऊन ते देखील सहभागी झाले होते.
या शोभायात्रेत चिमुकल्यानी तयार केलेले विविध देखावे घेऊन ते देखील सहभागी झाले होते.
तसेच सोलापूर शहरातील विविध चौकात देखील आकर्षक देखावे सकरण्यात आले आहेत.
हे देखावे पाहण्यासाठी आणि त्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येतेय.