Ashadhi wari 2025: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची महापूजा संपन्न; महाराष्ट्र अन् बळीराजासाठी विठ्ठलाच्या चरणी फडणवीसांचं साकडं

Ashadhi wari 2025: विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना फडणवीस यांनी केली.

Ashadhi wari 2025

1/10
आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली.
2/10
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले.
3/10
रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
4/10
आज आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.
5/10
महिनाभर वारी करत चालत असणारे वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले आहेत.
6/10
मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे असलेले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना विठूरायाच्या महापूजेचा मान मिळाला आहे.
7/10
मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
8/10
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले.
9/10
यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
10/10
आज पंढरी विठूरायाच्या नामघोषाच दुमदुमली आहे. मोठ्या संख्येने वारकरी दर्शनासाठी आले आहेत.
Sponsored Links by Taboola