अक्षयतृतीयेनिमित्त बा विठ्ठलाला आमरसाचा नैवेद्य; पंढरीत भाविकांच्या ताटातही आंब्याचा गोडवा
अक्षय तृतीयेनिमित्त आज पंढरीच्या विठुरायाच्या महाप्रसादातील पंच पक्वान्नात आंब्याच्या रसाची सुरुवात झाली असून आज अन्नछत्रातील सर्व भाविकांना आमरस पोळीचा महाबीर विठ्ठल मंदिराकडून देण्यात येत आहे.
mango juice to pandharpur mahaprasad
1/8
अक्षय तृतीयेनिमित्त आज पंढरीच्या विठुरायाच्या महाप्रसादातील पंच पक्वान्नात आंब्याच्या रसाची सुरुवात झाली असून आज अन्नछत्रातील सर्व भाविकांना आमरस पोळीचा महाबीर विठ्ठल मंदिराकडून देण्यात येत आहे.
2/8
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदू धर्मात आंब्याचा प्रसाद महत्त्वाचा मानला गेला असून यामुळेच आजपासून विठुरायालाही महाप्रसादात आमरस देण्यात सुरुवात झाली आहे.
3/8
विठुरायाच्या परिपूर्ण महाप्रसादामध्ये लिंबू ,चटणी, कोशिंबीर, पातळ भाजी ,सुकी भाजी, वरण-भात ,कढी , वरण-भात, पुऱ्या, भजी तर पकवानामध्ये पुरणपोळी , साखर भात ,श्रीखंड ,बेसनाचे लाडू , शेवयाची खीर आणि आमरस याचा समावेश असतो.
4/8
महाप्रसादातील शेवयाच्या खिरीची जागा आजपासून आमरसाने घेतली असून आता वटपौर्णिमेपर्यंत देवाच्या महाप्रसादात आमरस असेल.
5/8
रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीचा पंचपकवांनाचा महानैवेद्य असून मातेच्या महाप्रसादात कटाची आमटी आणि कडबू हे वेगळे पदार्थ असतात. त्यामुळे आज आता देवाच्या बरोबर देवाच्या भक्तांनाही अन्नछत्रामध्ये आमरस पोळीचा बेत मंदिर समितीच्या वतीने देण्यात येत आहे.
6/8
image 6
7/8
पंढरीच्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा म्हणून शेकडो हात झटत असतात, आज आमरस बनविण्यासाठीही महिलांनी सकाळपासूनच तयारी केली होती.
8/8
महाप्रसादालयात भाविकांकडूनही आमरसाचा गोडवा आवडीने चाखला जात असून भक्तांनी देखील आंब्याचा रस मिळत असल्याने समाधान व्यक्त केलं आहे.
Published at : 30 Apr 2025 01:47 PM (IST)