PHOTO : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावर पक्ष्यांच्या थव्याद्वारे नागाची आकृती
महादेवाचे भक्त अशी ओळख असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावर नागाची प्रतिकृती असलेला पक्ष्यांचा थवा घिरट्या घालत असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धरामेश्वरांच्या यात्रा कालावधीमध्ये नागाची प्रतिकृती असलेला पक्ष्यांचा थवा मंदिरावर गिरट्या घालत असल्याने सिद्धेश्वर भक्तांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
पक्ष्यांचा थव्याद्वारे नागाची आकृती बनल्याचा हा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
भोरड्या पक्ष्यांचा थवा मागील काही दिवसापासून सिद्धेश्वर मंदिर परिसरात निसर्गाचे आविष्कार दाखवत आहे.
चहूबाजूने तलाव, शेजारी भुईकोट किल्ला त्यात या पक्ष्यांच्या जणू कवायती सुरु असल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणखीच आनंद होत आहे.
श्री सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी शिवशंकर हब्बू यांच्या मते श्री सिद्धेश्वर महाराज हे भगवान शंकराचे अवतार आहेत.
महादेवाच्या मूर्तीवर ज्या पद्धतीने पाच फन असलेला नाग असतो अगदी त्याच पद्धतीने श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मूर्तीवर देखील पाच फन असलेला नाग आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सिद्धेश्वर महाराजांना शिवयोगी असे म्हटले जाते. त्यांनी सोलापूरच्या चहूबाजूने 68 लिंगाची स्थापना केली.
सोलापूरवर कोणतेही संकट येऊ नये यासाठी चारही दिशानी अशा पद्धतीने लिंग स्थापन करण्यात आले.