आरवलीत पांढऱ्या कमळांचा बहर; निसर्गाने उधळली सौंदर्याची चादर!

वेंगुर्लेच्या आरवलीत पांढऱ्या कमळांचा बहर पाहायला मिळत आहे. निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्त्वाचे अद्भुत संगम.

Continues below advertisement

Sindhudurg

Continues below advertisement
1/6
तळकोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावात सध्या पांढऱ्या कमळांचा सुंदर बहर पाहायला मिळत आहे.
2/6
पाणथळ भागात एखाद्या पांढऱ्या चादरीप्रमाणे ही कमळे फुलली असून संपूर्ण परिसर निसर्गरम्य दिसत आहे.
3/6
ऑक्टोबर हा कमळे फुलण्याचा हंगाम असल्याने सध्या येथे पर्यटकांचीही मोठी गर्दी दिसते.
4/6
रेडी-रेवस सागरी महामार्गावरून जाणाऱ्यांचे लक्ष या मोहक कमळांच्या मळ्यांकडे वेधले जाते.
5/6
धार्मिक कार्यात पांढऱ्या कमळाला विशेष महत्त्व असून कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या पूजेसाठीही ही फुले पाठवली जातात.
Continues below advertisement
6/6
तसेच आरवलीच्या वेतोबाला, ज्यांना ‘प्रति बालाजी’ म्हणतात, त्यांना देखील पांढऱ्या कमळांचा अंगरखा अर्पण केला जातो.
Sponsored Links by Taboola