चित्रकाराच्या कलेला सलाम! सिंधुदुर्गात छोट्या दगडावर चित्र रेखाटला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक दिन आज साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रायगडी तो सुवर्ण क्षण आला… न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…

6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो.
स्वराज्याची राजधानी रायगडावर आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेकाचे 25 सेमी बाय 12 सेमी आकाराचे हाताने दगडावर सर्वात लहान चित्र रेखाटले आहे.
सिंधुदुर्गातील समीर चांदरकर या चित्रकाराने रेखाटले आहे.
हे चित्र रंगवण्यासाठी अॅक्रेलिक कलरचा वापर केला.
चित्र पूर्ण करण्यासाठी जवळपास चार ते पाच तासांचा कालावधी लागला.
चित्रातले बारकावे दाखवण्यासाठी 0 नंबरच्या ब्रशचा वापर केला.
दगडाचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे चित्र रंगवताना अनेक अडचणी आल्या.