Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg Rains : सह्याद्रीच्या कुशीतलं सिंधुदुर्गातील हरकुळ धरण ओव्हरफ्लो, ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली विहंगम दृश्ये
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
26 Jul 2023 02:43 PM (IST)
1
सिंधुदुर्गात सध्या मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक छोटी मोठी धरणे भरुन गेली आहेत.
3
सह्याद्रीच्या कुशीतील कणकवलीतील हरकुळ धरणही 100 टक्के भरुन वाहत आहे.
4
गेले आठ दिवस सिंधुदुर्गात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हरकुळ धरण भरुन ओंसडून वाहू लागले आहे.
5
सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत असलेल्या या धरणाचे विहंगम दृष्य ड्रोन कॅमेऱ्यातून आणखीच खुलुन दिसत आहे.
6
कणकवलीचे छाया चित्रकार परेश कांबळी यांनी एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनने टिपलेली दृश्ये.
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 तासात सरासरी 65.4 मिमी पाऊस झाला असून एकूण सरासरी 1987.3 मिमी पाऊस झाला आहे.