Amboli Valley : पावसाळ्यापूर्वी खबरदारी, आंबोली घाटात संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरु
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
13 Apr 2023 12:46 PM (IST)

1
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख घाटरस्ता असलेल्या आंबोली घाटात संरक्षक जाळी बसविण्याचं काम सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोलीमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो.

3
यामुळे घाटात दरडी कोसळून मार्ग बंद होणे तसेच दुर्घटना होत असतात.
4
यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून घाटात भूस्खलन ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरु केले आहे.
5
ही जाळी बसवल्याने पावसाळ्यात काही प्रमाणात तरी दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी होईल.
6
दरड कोसळली तर भले मोठे दगड जाळीत अडकून कोणतीही प्रकारची दुर्घटना घडणार नाही.
7
सावंतवाडी-बेळगाव मार्गावरी आंबोली घाटात प्रतिवर्षी दरडी कोसळतात.
8
विशेषत: पावसाळ्यात हा धोका अधिक असतो.
9
त्यामुळे काही वेळा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागते