PHOTOS : गणपती गावाला जाताच 'श्रावण' सुटला, मच्छीमार्केट अन् मटनाच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या
Sindhudurg News : तळकोकणात गणपती विसर्जनानंतर मच्छ खवय्यांची मच्छी मार्केट आणि मटण मार्केटमध्ये तुंबळ गर्दी झाली आहे.
Sindhudurg News
1/10
श्रावण महिना आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवर मासांहारी अन्नपदार्थांपासून दूर असलेले खवय्ये आता पुन्हा मच्छी-मटणाकडे वळले आहेत.
2/10
अनेकजण श्रावण आणि गणेशोत्सव काळात मासांपासून वर्ज्य करतात.
3/10
त्यामुळे 45 दिवसांनी मासे खाण्याची पहिली संधी मिळाली.
4/10
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ कुडाळ येथे रविवारी मच्छी खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली.
5/10
माशांचे दर तुलनेत जास्त असल्याचे पाहायला मिळाले.
6/10
मात्र, ग्राहक मोठ्या प्रमाणावर माशांची खरेदी करत असल्याचे चित्र आहे.
7/10
मच्छीबरोबरच मटणाच्या दुकानांमध्ये देखील मोठी गर्दी असल्याचे दिसून आले.
8/10
सर्वसामान्य बाजारपेठांच्या तुलनेत मच्छी मार्केटमध्ये गर्दीचे प्रमाण अधिक होते.
9/10
अनेक कुटुंबांनी रविवारी मच्छी-भात, सोलकढी अशा पारंपरिक जेवणाची रेलचेल केली.
10/10
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदर आणि मच्छी मार्केट असलेल्या अलिबागमध्ये देखी नागरिकांचील गर्दी उसळली आहे.
Published at : 07 Sep 2025 01:09 PM (IST)