वेंगुर्लेचं ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात किरणोत्सवाचा योग, भाविकांनी अनुभवलं विलोभनीय दृश्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात असलेलं पुरातन सातेरी मंदिर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या पांडवकालीन मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे.

ज्याप्रमाणे कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिरात किरणोत्सव होतो, त्याचप्रमाणे इथेही किरणोत्सव झाला
वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीच्या मंदिरातील किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
खगोलशास्त्राचा अभ्यास करुन वास्तूशास्त्र कलेचा सुंदर मिलाप म्हणजे वेंगुर्ले शहरातील सातेरी मंदिरातील किरणोत्सव सोहळा आहे.
श्री देवी सातेरीच्या मुखावर सकाळची सोनेरी किरणे पडल्यानंतर फार विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळतं.
हा किरणोत्सव योग सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन यामध्ये घडून येतो.
सकाळी सव्वासात ते सातेसाड वाजता हा योग असतो.
आज श्रीदेवी सातेरी मंदिरात हा योग अनुभवायला मिळाला आहे.