PHOTO : नभ उतरु आलं....महाराष्ट्राच्या चेरापुंजीत धुक्याची चादर!
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
13 Jun 2022 11:12 AM (IST)
1
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत धुक्याची चादर पसरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन चार दिवस झाले मात्र तिसऱ्या दिवशीच पाऊस गायब झाला.
3
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल आणि आज पावसाचा पत्ता नाही.
4
मात्र जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत जणू ढग डोंगरावर अडकल्याप्रमाणे दाटून राहिले आहे.
5
आंबोलीला ये-जा करत असताना या नयनरम्य नजाऱ्याचं दर्शन होतं.
6
ढग खाली येऊन संपूर्ण आंबोली दरी व्यापून टाकली आहे.
7
त्यामुळे ढगांची चादर पसरल्याप्रमाणे आंबोलीत भासत आहे.
8
आंबोलीतून ये-जा करत असलेल्या पर्यटकांना तसेच वाहनचालकांना पसरलेल्या ढगांची भुरळ पडत आहे.
9
काश्मीरमध्ये गेल्याचा भास या नजऱ्यातून येत आहे. अनेक पर्यटकांना सेल्फीचा मोह आवरता येत नाही.