Sindhudurg News: तळकोकणातील तिलारीत आढळली रक्ताने माखलेली कार; अपघात की घातपात?, पोलिसांकडून शोध सुरू
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमध्ये पुलाच्या बाजूला एक कार रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement
Sindhudurg News
Continues below advertisement
1/6
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी येथील मुख्य वसाहती जवळील पुलाच्या बाजूला एक कार रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे.
2/6
सदर कारची नंबर प्लेट गायब असल्याने अपघात की घातपात? याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
3/6
स्थानिक नागरिकांना पुलानजीक चिखलात अडकलेली कार झाडीत दिसली.
4/6
जवळ जाऊन पाहिल्यानंतर वाहनाच्या आतील भागात आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले.
5/6
दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत वाहनाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
Continues below advertisement
6/6
कारची नंबर प्लेट गायब असल्याने वाहन नेमके कोणाचे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, आत कोणीही व्यक्ती आढळली नाही.
Published at : 24 Oct 2025 08:50 AM (IST)