PHOTO : दोन्ही बाजूने पाहता येणारा कोकणातील एकमेव बाबा धबधबा
हिरवळीने बहरलेला निसर्ग पाहायचं असेल तर पावसाळ्यात कोकणातील नक्कीच भेट द्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रावणात कोकणात ऊन पावसाचा खेळ आणि निसर्गाचे खुललेलं रुप अनुभवायला मिळतं.
हिरवाईने नटलेल्या कोकणात सह्याद्रीच्या कुशीतून वाट काढत उंच डोंगरावरुन मनमुरादपणे कोसळणारे अनेक धबधबे आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील.
मात्र कोकणात एक असा धबधबा आहे, ज्या धबधब्याचं सौदर्य दोन्ही बाजूंनी पाहता येतं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीजवळील कुंभवडे गावात असलेला बाबा धबधबा.
या धबधब्याचं आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी डोळ्यादेखत पांढराशुभ्र फेसाळत कोसळताना पाहायला मिळतो.
खरंतर हा नैसर्गिक धबधबा नसून तो तशा पद्धतीने बनवला गेलेला धबधबा आहे.
माजी विधानसभा अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या खाजगी जागेत हा धबधबा असून ब्लटिंग करुन धबधब्याच्या मुळाशी गुहा बनवण्यात आली. त्यामुळे हा धबधबा गुहेत राहून आणि समोरुन अशा दोन्ही बाजूंनी पाहता येतो.
150 ते 200 फुटांवरुन शंकराच्या जटेतून जशी गंगा वाहते तशा पद्धतीने हा धबधबा कोसळत आहे.
बाबा धबधब्याजवळ जाताना सह्याद्रीच्या कुशीतून अलगदपणे पांढरेशुभ्र लहान मोठे असे धबधबे कोसळताना दिसतात.
हिरव्यागार निसर्ग आणि त्यातून वाहणारे धबधबे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतात.
बाबा धबधबा सिंधुदुर्ग आणि बेळगाव या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरुन कोसळत असल्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.