Tortoise : तळकोकणातील सापडला दुर्मीळ भारतीय तारा कासव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील दोडामार्ग विजघर मार्गावर तिलारी येथे देव पाताडेश्वर मंदिरा जवळ दुर्मीळ असा भारतीय तारा कासव आढळून आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा तारा कासव पाहण्यासाठी प्राणीमित्रांनी ठिकाणी गर्दी केली होती. भारत आणि श्रीलंकेत हे तारा कासव आढळते. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ते दुर्मिळ प्रजाती असल्याची माहिती प्राणीमित्रानी दिली.
मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी या तारा जातीचे कासव आढळलेले नाही. या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
दक्षिण भारतामध्ये आढळणारे इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच ती जवळ बाळगण्यास बंदी आहे.
त्यामुळे तारा कासव वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या अनुसूची अंतर्गत संरक्षित आहे. तेथे प्रजाती ताब्यात आढळल्यास त्याला सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
विशेष म्हणजे या कासावाच्या पृष्ठभागावर तारे व कुबड्या सारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा विशेष आहे. सध्या हे कासव वनविभागाच्या ताब्यात असून वनविभाग हे कासव या ठिकाणी कसं आलं याची माहिती घेत आहे.