Rare Spider : सिंधुदुर्गच्या जंगलात आढळली कोळ्याची नवीन प्रजाती...
महाराष्ट्राचे अॅमेझॉन म्हणून कोकणातील जंगलाची ओळख आहे. कोकणच्या निसर्गरम्य जंगलात पशू-पक्षी, प्राणी, कीटक, जलचर मोठ्या प्रमाणात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळेच अभ्यासकांना आणि संशोधकांना तळकोकणातील जंगल नेहमीच भुरळ घालत असतं.
सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळबांबर्डे येथील अभ्यासक गौतम कदम आणि केरळमधील अभ्यासकांनी जम्पिंग स्पायडर' च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.
चीन, मलेशियामध्ये झालेल्या नोंदीनंतर भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद सिंधुदुर्गात झाली आहे.
ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम या दोन संशोधकांनी गेली दोन वर्षापासून या कोळीवर संशोधन केलं आहे.
'जम्पिंग स्पायडर' च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.
'स्पारबांबॅरस सिंधुदुर्ग' या नावाने 'जम्पिंग स्पायडर' कोळीचं नामकरण करण्यात आलं आहे.
या नावाने आता जगभरात या कोळीची ओळख होणार आहे. स्पारबांबॅरस हे नाव हा कोळी बांबूच्या झाडावर याचा अधिवास असल्याने तस नामकरण करण्यात आले आहे.
हा कोळी ज्या ठिकाणी जाळ बनवतो त्याचं ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या कीटकांचा भक्ष करतात.
भारतात जवळपास 2000 कोळ्याचे प्रजाती सापडतात. तर जगभरात 51,000 कोळ्यांचे प्रजाती सापडतात.
जम्पिंग स्पायडरच्या 300 प्रजाती भारतात आढळतात.