Sindhudurg Pat Lake : बदलत्या वातावरणाचा स्थलांतरित पक्ष्यांना फटका, पक्ष्यांचं नंदनवन पाट तलाव सुनंसुनं
निसर्गाच्या लहरीपणाचा आणि सततच्या बदलणाऱ्या वातावरणाचा कोकणात स्थलांतरित होणाऱ्या पक्षांना फटका बसला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुरोप, मध्य आशिया आणि अमेरिका खंडातून हजारो किलोमीटर अंतर पार करुन मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी कोकणात येतात.
मात्र यंदा स्थलांतरित पक्षांचं प्रमाण 80 ते 90 टक्के प्रमाण घटलं आहे.
तळकोकणातील स्थलांतरित पक्षांचं नंदनवन असलेलं पाट तलाव तसेच इतर ठिकाण सुनंसुनं वाटू लागली आहेत.
पक्षीप्रेमींच्या मते सतत बदलत असणाऱ्या वातावरणाचा फटका स्थलांतरित पक्षांना बसला आहे.
नोव्हेंबर ते जानेवारी हा पक्षांचा स्थलांतरीत होण्याचा काळ आहे.
मात्र अद्यापपर्यंत 10 ते 20 टक्के स्थलांतरित पक्षी कोकणात दाखल झाले आहेत.
मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पक्षांना बसला असून पक्षीप्रेमी, पर्यटकांचा हिरमोड होत आहे.