सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय

मालवणमधील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींना संताप व्यक्त केला होता.

Malvan fort close for tourist

1/7
मालवणमधील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींना संताप व्यक्त केला होता.
2/7
शिवप्रेमींच्या संतापानंतर राज्य सरकारने पुन्हा नव्याने तितकाच रुबाबदार आणि मोठा पुतळा बसविण्याचा शब्दही दिला होता, त्यानुसार आता मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा दिमाखात उभारला आहे.
3/7
शिवरायांचा नवा पुतळा बसवल्यानंतर देखील येथील चबुतऱ्याजवळ काही काम बाकी असल्याचं किंवा काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर, आता येथील प्रशासनाने दखल घेतली आहे.
4/7
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला उद्यापासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
5/7
किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
6/7
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या (Paving) आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत उद्या 22 जून 2025 पासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे.
7/7
सावंतवाडी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. मात्र,किती दिवस बंद राहील आणि केव्हा पर्यटकांसाठी खुला होईल हे निश्चित सांगण्यात आलं नाही.
Sponsored Links by Taboola