Sindhudurg : तळकोकणातील गडनदी आणि जाणवली नद्यांचा संगम; ड्रोन कॅमेऱ्यातील नयनरम्य दृश्य

Sindhudurg : कणकवली शहर दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं शहर असून कणकवली मधील गडनदी आणि जानवली नदीचा संगम वरवडे गावात होतो. याच ठिकाणची ही नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपली आहेत.

Sindhudurg river sangam

1/6
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
2/6
कणकवली शहर दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं शहर असून कणकवली मधील गडनदी आणि जानवली नदीचा संगम वरवडे गावात होतो.
3/6
याच ठिकाणची ही नयनरम्य दृश्य परेश कांबळी यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून टिपली आहेत.
4/6
नदीचं विस्तारलेलं रूप आणि हिरवाईने नटलेलं तळकोकणाचं विहंगम दृश्य नजरेला भुरळ घालणारं आहे.
5/6
कोकणात पावसात निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. हिरवीगार झाडी, मोठ-मोठे डोंगर, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि शांत समुद्र. हे वातावरण अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात येतात.
6/6
या नद्यांचा संगम अतिशय नयनरम्य आहे.
Sponsored Links by Taboola